धोरण देशभक्तीचे, की परधार्जिणे?
स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांतील सर्वांत गंभीर अरिष्टाला भारतीय शेतीव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे. हे अरिष्ट निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्भवलेले नसून, भारत सरकारच्या शेतीविषयक धोरणातून उद्भवलेले आहे. सरकारने जागतिक व्यापारी संघटनेत एप्रिल १९९४ मध्ये शेतीविषयक जो करार केला त्या कराराच्या शर्तीमुळे भारत सरकारला हे धोरण राबवावे लागत आहे. भाजप-नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जुलैमध्ये आपले शेतीविषयक धोरण जाहीर केले आहे. …